महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे

धुळे जिल्ह्याच्या क्रीडा विभागा मार्फत आपले स्वागत आहे.

शुभेच्छासंदेश


महाराष्ट्रातील धुळे जिल्हयाला विविध क्षेत्रात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातसुध्दा धुळे जिल्हयाचा नांवलौकीक कुस्ती, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बॅडमींटन, टेबलटेनिस, क्रिकेट या क्रीडा प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरावर होत आहे. याच अनुषंगाने धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने राज्यस्तर व जिल्हास्तर विविध क्रीडा विकास योजना व क्रीडा कार्यक्रम माहीती बेबसाईटव्दारा उपलब्ध करुन दिली ही नक्कीच चांगली बाब आहे. या संकेतस्थळावर धुळे जिल्हयातील क्रीडा संस्कृती, क्रीडा संबंधी योजना, क्रीडा स्पर्धा इत्यादी बाबतची महत्वपूर्ण माहीती समाविष्ट करण्यात आलेली आहे. मला खात्री आहे की, हे संकेतस्थळ सर्व क्रीडापटू क्रीडातज्ञ, विशेषत: खेळाडू व क्रीडा क्षेत्राशी जुळलेल्या सर्व व्यक्तीना अत्यंत उपयुक्त ठरेल. सन 2018-19 हया वर्षातील शालेय व इतर क्रीडा स्पर्धात सहभागी होणा-या सर्व खेळाडूंना हार्दीक शुभेच्छा.

photo

राहुल रेखावार (भा. प्र. से.)
जिल्हाधिकारी, धुळे


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या आधिपत्याखालील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या वतीने धुळे जिल्ह्यात शासनाच्या क्रीडा विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देणारी वेबसाईट प्रसिद्ध केलेली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील सर्व क्रीडा विषयक उपक्रम व योजनाची माहिती सर्व सामान्य नागरिक, खेळाडू, प्रशिक्षक यांना उपलब्ध होणार आहे. या उपक्रमास मी नाशिक विभागाचा उपसंचालक या नात्याने मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

डॉ.जयप्रकाश दुबळे, उपसंचालक ,
क्रीडा व युवकसेवा, नाशिक


महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालया चीस्थापना सन 1971 मध्ये झाली असूनया क्रीडा संचालनालयामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे माध्यमातून जिल्ह्यात शालेय क्रीडास्पर्धांचे आयोजन व राज्याच्या क्रीडा विकासाशी निगडित योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम करण्यात येते. राज्य शासनामार्फत क्रीडा विकासाकरीता राज्य व जिल्हा स्तरावर अनेक योजना / उपक्रम राबविण्यात येतात. या योजना / उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. क्रीडा क्षेत्रातील अद्यावत माहिती प्रत्येकापर्यंत उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. धुळे जिल्हा हा खो खो या खेळाची ची पंढरी म्हणून ओळखला जात होता, तसेच धुळे जिल्ह्यात कुस्तीची चांगली परंपरा आहे. जवळपास सर्व प्रसिद्ध पहिलवान धुळे जिल्ह्यात येऊन कुस्ती खेळून गेलेले आहेत. त्याचप्रमाणे कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिंट्न, हॅन्डबॉल, तलवारबाजी, बास्केटबॉल, टेबलटेनिस, ईत्यादी खेळ धुळे जिल्ह्यात खेळले जातात. धुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील घडामोडी, विविध स्पर्धा, नामवंत खेळाडू, पुरस्कारार्थी, क्रीडा सुविधा इ. माहिती सर्वसामान्य लोकांपुढे सादर करतांना अत्यंत आनंद होतो आहे. या माध्यमातून आपला जिल्हा क्रीडा क्षेत्रात काय करतो आहे याचे चित्र उभे करणे सुलभ होणार आहे. तसेच, आपल्या जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात असलेल्या उणीवा भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करता येणे शक्य होणार आहे. शासनामार्फत क्रीडा क्षेत्रासाठी असलेल्या योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावादेखील या माध्यमातून घेता येणे शक्य होणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा अधिकारी, धुळे कार्यालय करीत असलेले काम व शासनाच्या विविध योजना तसेच धुळे जिल्ह्याची क्रीडा विषयक सद्यस्थिती सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

naik

संजय सबनीस
जिल्हा क्रीडा अधिकारी, धुळे


 • राज्य स्तरावरील योजना

  क्रीडा विकासासाठी पायाभूत सुविधांची उभारणी… — Read More

 • पुरस्कार / शिष्यवृत्ती

  धुळे जिल्ह्यातील विविध क्रीडा व युवा पुरस्कार
  महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य जिवन गौरव पुरस्कार… — Read More

 • महत्वाचे शासन निर्णय

  केंद्र पुरस्कृत आयसीटी योजनेंतर्गत नियुक्त ऑपरेटर्सचा परफॉर्मन्स तपासणेबाबत… — Read More

गॅलरी

ताज्या बातम्या